〉 कोणत्याही संख्येचे दिलेले ℅ काढताना
प्रथम 1 % 【टक्का】 अथवा 10 % काढा.
त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी
काढता येतात.
उदा.
» 500 चे 10% = 50 【10 टक्के काढताना
एक शून्य कमी करा.】
» 125 चे 10%=12.5 किंवा एकक स्थानी
शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे
दशांश चिन्ह घ्या.
» 500 चे 30% = 150
» 500 चे 10% = 50
» 30% = 10%×3
» =50×3 = 150
〉 जर दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे
असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.
उदा.
» 368 चे 12.5% = ?
» 368×12.5/100
» 368×1/8= 46
〉 जर दिलेल्या संख्येचे 20 % काढावयाचे
असल्यास, त्या संख्येला 1/5 【 0.2 】 ने
गुणा.
उदा.
» 465 चे 20% = 93
» 465×20/100
» =465×1/5 ने गुणा = 93
〉 जर दिलेल्या संख्येचे 25 % काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ 【0.25】 ने गुणा.
उदा.
» 232 चे 25% = 58
» 232×25/100
» =232×1/4= 58
〉 जर दिलेल्या संख्येचे 50 टक्के काढावयाचे
असल्यास त्या संख्येला ½ 【0.5】 ने गुणा.
उदा.
» 70 चे 50% = 35
» 70×50/100
» =70×1/2
» =35
〉 जर दिलेल्या संख्येचे 62 ½ टक्के 【62.5】
काढावयाचे असल्यास,त्या संख्येला 5/8
ने गुणा.
उदा.
» 400 चे 62.5% = 250
» 400×62.5/100
» =400×5/8
» =250
〉 जर दिलेल्या संख्येचे 75 टक्के काढावयाचे
असल्यास त्या संख्येला ¾ ने गुणा.
उदा.
» 188 चे 75% = 141
» 188×3/4
» =141
〉 जर दिलेल्या संख्येचे 87 ½ % 【87.5】
काढावयाचे असल्यास,त्या संख्येला 7/8
ने गुणा.
उदा.
» 888 चे 87.5% = 777
» 888 × 87.5/100
» =888×7/8
» =777
〉 दिलेल्या संख्येचे जर त्या संख्येएवढेच टक्के
काढावयाचे असल्यास , त्या संख्येचा वर्ग
काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर
दशांश चिन्ह घ्या.
उदा.
» 25 चे 25% = 6.25
» 25 × 25/100
» = 625/100
» =6.25
शेकडेवारी
0
Tags





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!